Deool-Band-2 : 10 वर्षांपूर्वी ‘देऊळ बंद’नेpre महाराष्ट्रातील स्वामी भक्तांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवरSuccess मिळवला. आता 11 वर्षांनंतर लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे ‘देऊळ बंद 2’ घेऊन येत आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात एका महिलेने थेट स्वामींना आव्हान दिले आहे. मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत असून, पहिल्या भागातील राघव शास्त्रीची भूमिका साकारणारा गश्मीर महाजनीसुद्धा दिसणार आहे. मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Deool-Band-2)
Deool Band 2 हा Deool Band या मराठी चित्रपटाचा सिक्वेल आहे. दिग्दर्शन Pravin Tarde यांनी केले आहे. चित्रपट 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा २०१५ सालचा मराठी चित्रपट आहे. कथा एका तरुण वैज्ञानिकाभोवती फिरते — डॉ. राघव शास्त्री. (Dr. Raghav Shastri) तो NASA मध्ये काम करणारा, अत्यंत बुद्धिवादी आणि नास्तिक स्वभावाचा असतो. भारतात परतल्यानंतर त्याला वाटते की लोक अंधश्रद्धेमुळे देवावर जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे तो एका मंदिराला बंद करण्याचा निर्णय घेतो.
पण कथा इथे वळण घेते. त्याच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडतात ज्या त्याच्या विज्ञानवादी विचारांना आव्हान देतात. चित्रपटात Mohan Joshi यांनी साकारलेले स्वामी समर्थ हे पात्र महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थ आणि राघव यांच्यातील विचारांचा संघर्ष हा चित्रपटाचा मुख्य भाग आहे.
प्रवीण तरडे(Pravin Tarde) यांच्या आगामी चित्रपटात एका शेतकरी महिलेची संघर्षमय कथा आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या यांसारख्या प्रश्नांवर ती थेट देवाला जाब विचारते. अभिनेत्री स्नेहल तरडे (Snehal Tarde)मुख्य भूमिकेत असून मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपट श्रद्धा-अंधश्रद्धा, देवावरचा विश्वास आणि आधुनिक विचार यांच्यातील संघर्ष दाखवतो. या भागात एका आस्तिक शेतकऱ्याची आणि त्याच्या नास्तिक पत्नीची कथा दाखवण्यात आली आहे, जी स्वामी समर्थांची परीक्षा घेते. ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल उत्सुकता आणि चर्चा दोन्ही दिसत आहेत.