देशाची ‘सुपर स्पीड’ भरारी! भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा ‘फर्स्ट लुक’ जाहीर

Super-speed : देशाची ‘सुपर स्पीड’ भरारी! भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा ‘फर्स्ट लुक’ जाहीर,दिल्लीतील रेल भवन परिसरात प्रदर्शित करण्यात आलेल्या या आकर्षक डिझाईनने देशभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नवी दिल्ली : भारतातील बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाने आता प्रत्यक्ष आकार घेण्यास सुरुवात केली असून देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकृत ‘फर्स्ट लुक’  रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आला. दिल्लीतील रेल भवन परिसरात प्रदर्शित करण्यात आलेल्या या आकर्षक डिझाईनने देशभरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.Super-speed

जपानच्या अत्याधुनिक ‘शिनकानसेन’ तंत्रज्ञानावर आधारित ही बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणार असून मुंबई ते अहमदाबाद हा तब्बल ५०८ किलोमीटरचा प्रवास अवघ्या दोन ते सव्वा दोन तासांत पूर्ण होणार आहे. ट्रेनच्या पुढील भागाला पक्ष्याच्या चोचीसारखा लांबट ‘एरोडायनामिक’ आकार देण्यात आला असून त्यामुळे हवेचा प्रतिकार कमी होऊन वेग आणि सुरक्षितता अधिक प्रभावी होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये एकूण १२ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर येथे बुलेट ट्रेन(Bullet Train) थांबणार आहे. तर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, प्रकल्पाचे ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. गुजरातमधील अनेक स्थानकांवरील खांब आणि संरचनात्मक काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विक्रोळी परिसरात समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या अंडरसी बोगद्याचे कामही वेगाने सुरू असून त्यासाठी अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीनचा वापर करण्यात येत आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सुरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली ट्रायल रन याच वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तर २०२७-२८ पर्यंत संपूर्ण प्रकल्प सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा प्रकल्प देशाच्या वाहतूक व्यवस्थेला नवे तंत्रज्ञान, वेग आणि आधुनिकतेची दिशा देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

The Mumbai-Ahmedabad high-speed rail corridor includes a total of 12 stations. In Maharashtra, the bullet train will stop at BKC in Mumbai, Thane, Virar, and Boisar. In Gujarat, the stations include Vapi, Bilimora, Surat, Bharuch, Vadodara, Anand, Ahmedabad, and Sabarmati.

Social Media