Donald Trump : अर्थव्यवस्थेत गेल्या 10 वर्षात 3 पटीने वाढ

Donald Trump : अर्थव्यवस्थेत गेल्या 10 वर्षात 3 पटीने वाढ
2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर (trillion-dollars) पर्यंतची अर्थव्यवस्था तयार करायची, 10 लाख रोजगार दरवर्षी तयार करायचे आहेत. वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास यात वित्तीयची तूट 2.5 टक्क्यांखाली आणायची आहे. शंभर उपक्रम घेतले आहेत, ज्यात व्हिजन मॅनेजमेंट तयार केले आहेत.

मॅकेन्जीसारखी कंपनी आपण सोबत घेतली आहे, हे पुस्तक तयार करण्याइतके सोपे नाही. बजेट ट्रिलियन डॉलर (trillion-dollars)नाही करायचे, अर्थव्यवस्था तयार करायची आहे. आज अर्थव्यवस्था 51 लाख कोटीला पोहोचली आहे, साधारण 40 लाख कोटींपर्यंत आणखी विस्तारीत करायची आहे.

सन 2012-13 साली 13 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था आपल्या राज्याची होती, आता ती 3 पट गेली आहे. फक्त 10 वर्षात 3 पट अर्थव्यवस्था गेली आहे. महाराष्ट्र एकमेव आहे, 660 बिलियन डॉलरपर्यंत आपण पोहोचलो आहोत, इतर कोणतंही राज्य आपल्या जवळपास नाही.

आपण हाफ ट्रिलियन पार करत पुढे गेलो आहोत. पुढील 4-5 वर्षात दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण ट्रिलियन होऊ मात्र नाहीतर 1-2 वर्षे त्याचा इफेक्ट राहातो. जगात काही देशांची अर्थव्यवस्था देखील ट्रिलियन डॉलर नाही, बेल्जियमची आहे, तेवढे आपण होऊ, अशी माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.

डोनाल्ड ट्रम्पही 2 दिवस दावोसमध्ये राहतात (Donald Trump)

अमुलाग्र बदल काहींच्या येण्याने झाले आहेत, मात्र काहींनी तर फक्त फोटोच काढले. काही करारामध्ये चीनी उत्पादन होते, त्यांवर आपण बंदी आणली म्हणून ते कार्यान्वित झाले नाहीत, अशी काही वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे हे करार अंमलात आले नाहीत.

पण, दावोसबद्दल देखील खूप बोललं गेलं. एक करार आदित्यजी यांनी केला होता, त्याचे फोटो आहेत. आपण म्हणाला ते खरं आहे, छोटं गाव आहे दावोस, मात्र ट्रम्प 2-2 दिवस तिथे राहतात  जगासोबत चालायचं आहे तर तुम्हाला तिथे राहावंच लागतं. राज्याची मोठी चर्चा तिथे होते. कंपन्यांचे परकीय गुंतवणूकदार असतात त्यांची इच्छा असते करार तिथे व्हावे. कंपन्या तिथे आपल्या बैठका ठेवतात ,

थेट परदेशी कंपन्या आपल्याकडे येत नाहीत . काही कंपन्यांमध्ये एफडीआय असतो. मंत्रालयात बोलवले पाहिजे आणि करार केला पाहिजे. पण, उत्सव केला की लोकांपर्यंत पोहोचता येतं, मार्केटिंग होतं, अधिक लोकांपर्यंक पोहोचता येतं, असे म्हणत दावोस करारावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.

Social Media