शाश्वत विकासातुन सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

Pankaja-Munde : शाश्वत विकासातुन सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्राचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असला पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध कृती, संस्थात्मक बळकटी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून आपण शाश्वत विकासातून सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. (Pankaja-Munde)

आज “माझी वसुंधरा”(“My Vasundhara”) अभियानामुळे पर्यावरण संरक्षण हा विषय प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे राज्यात शाश्वततेची मजबूत पायाभरणी होत आहे. राज्य शासनाने पर्यावरणीय प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान या राज्यव्यापी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. जैविक शेती ही अभियान पुढच्या टप्यात राबविण्यात येणार असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून सुपीक जमीन, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवेसाठी पर्यावरणरक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ (‘Vasudhaiva Kutumbakam’)या सिद्धांतावर भारताचा दृढ विश्वास आहे. पर्यावरण रक्षण या सिद्धांताचाच एक भाग असून, या अभियानास स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत असलेला प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद आहे. निसर्ग संपत्ती ही आपणास वारसा पद्धतीने पूर्वजांकडून ऋण स्वरूपात मिळाली आहे. ती सुस्थितीत पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची असून या पर्यावरण संवंर्धन मोहिमेत प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी केले.

या प्रसंगी माझी वसुंधरा अभियानावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. तसेच अभियानातील यशोगाथांवर आधारित “कॉफी टेबल बुक” आणि “द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन” (मराठी-इंग्रजी पर्यावरण शब्दकोश) यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार – ग्रामपंचायत (एकूण 18 स्थानिक संस्था), राज्यस्तरीय द्वितीय, तृतीय, उंच उडी आणि उत्तेजनार्थ पुरस्कार (एकूण ४५), राज्यस्तरीय द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार (एकूण 34 स्थानिक स्वराज्य संस्था) नगर परिषद व नगर पंचायत गट यांना पुरस्कारांनी संस्थां आणि अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Social Media