Intangible-Cultural-Heritage : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशीच्या कामकाजात सन २०२५-२६ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा,
लक्षवेधी, प्रश्नोत्तरे, २९३अन्वये चर्चा या नियमित कामकाजासाठी दोन सत्र घेण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची सूचना कॉंग्रेस सदस्य नाना पटोले(Nana Patole) यांनी केली. मात्र अध्यक्ष एड राहूल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी ती फेटाळून लावत या सदनात तश्या प्रकारची सूचना करता येणार नसल्याचे सांगितले.
तर लाडक्या बहिण योजनेच्या अंमलबजावणीवरुन विरोधकानी सभात्याग हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
सकाळी दहा वाजता विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांचे कामकाज घेण्यात आले.यावेळी
मागाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रभाग क्र ५ ५० वर्षापासुन वास्तव्य करणा-यांना फोटोपास असताना विस्थापीत केले जात असल्याबाबत प्रकाश सुर्वे आणि अन्य
सदस्यांच्या लक्षवेधीला नगरविकास मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या मार्फत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
हेमंत रासने यांनी पुण्यातील कसबा पेठ(Kasba Peth) परिसरातील वाढत्या गर्दी आणि वाहतूक कोंडी बाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधिला उत्तर देताना
सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्याकडे या बाबत बैठक घेवून निर्णय घेतला जाईल. या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी संबंधित लोकप्रतिनीधीसोबत
ही बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. लक्षवेधी ३ संबंधित सदस्य नसल्याने तर क्रमांक ४ त्याबाबतचे उत्तर न आल्याने पुढे ढकलण्यात आली तेव्हा याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे
भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली,
लक्षवेधी क्रमांक पाच बाबत मंत्री अनुपस्थित राहिल्याने होवू शकले नाही. विजयसिंह पंडित(Vijaysinh Pandit) आणि अन्य सदस्यांची ही लक्षवेधी होती.
पुणे जिल्ह्यात अंबिका पावडर(Ambika Powder) कंपनीत झालेल्या अपघात प्रकरणी कामगाराना नुकसानभरपाई मिळण्याबाबत कार्यवाही केली जात असल्याचे कामगारमंत्री आशिष
फुंडकर यांनी सांगितले. या अपघाता नंतर सर्वच कारखान्यांमध्ये विशेष मोहिम राबवून सुरक्षा तपासणी केली जात असल्याचे ते म्हणाले.
सकाळी अकरा वाजता नियमित बैठक प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे हारून खान यांनी वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल
येथे विकास नियमावलीचे उल्लंघन करून विकास केल्या बाबतचा मुद्दा उपस्थित केला. नगरविकास मंत्री उदय सांमत यांनी हे काम नियमितीकरणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली.
यावेळी किसोर जोरगेवार यांनी मुंबईचे प्रश्न प्राध्यान्याने घेतले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्रअध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासाला वेळ न घेण्याची सूचना केली.
वाढवण येथील बंदराच्या विकासाला समृध्दी महामार्गाला जोडण्याबाबत विशेष प्राधिकरन स्थापन करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन निर्णय
घेण्याबाबत मंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांनी माहिती दिली. मुंबईत शाळांच्या खाजगीकरणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर
गदा येत असल्याबाबत अस्लम शेख यांच्या प्रश्नावर मंत्री मंगलप्रभात लोढा(Mangaleprabhat Lodha) यांनी आपल्याला धमकविण्यात आल्याचा
मुद्दा मांडला.यावेळी अस्लम शेख आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
प्रश्नोत्तरांनंतर कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज घेण्यात आले त्यात अनेक विभागाचे अहवाल वार्षिक लेखे पटलावर ठेवण्यात आले.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी औचित्याच्या मुद्द्याव्दारे मुंबईत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी
कठोर कारवाई करण्याबाबत लक्ष वेधले. या बाबत शक्ति विधेयक
विधानसभेने मंजूर केले त्यावर केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींच्या मंजूरीबाबत काय स्थिती आहे ते तपासून तातडीने अश्या प्रकरणात न्याय देण्याची
हमी सरकार देणार की नाही असा सवाल त्यांनी केला.
अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्याकडून कालच माहिती देण्यातआल्याचे सांगितले.
त्या नंतर अनेक सदस्यांनी त्यांच्या विभागातील तातडीच्या महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर मुद्दे मांडले. त्यानंतर नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या
मनमानी कारभारा विरोधात नाराजी व्यक्त करत राज्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग चालविण्याबाबत प्रस्ताव मांडण्याची सूचना केली.
मात्र अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी त्यांच्या सूचनेला
फेटाळून लावताना नियमातील तरतूद वाचून दाखवली. त्यानुसार असा प्रस्ताव मांडण्याचे या सदनालाअधिकार नसल्याचे ते म्हणाले.
असा प्रस्ताव केवळ संसदेत मांडला जावू शकतो असे ते म्हणाले.
मुंबईच्या तीन टोल नाक्यांवर इ टोल वसुली कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही वाहनाचा कर वसूल केला गेला असेल तर त्याचा परतावा द्यावा
असे निर्देश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिले. हे अनिल पाटील आणि अन्य सदस्यांचा तारांकीत प्रश्न होता.
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार
करण्यात हातभार लागेल, असे निवेदन सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी सभागृहात केले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी
अधोरेखित करणारे मराठा लष्करी भुरचनेचे यूनेस्कोचे मानांकन आपण या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली आपण मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच मूर्त स्वरूपाचा आहे.
आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आला आहे,
ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने वर्ष 2025-26 साठी दीपावलीचे नामांकन केले होते.
अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे. (Intangible-Cultural-Heritage)
दीपावली हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी आणि मराठी परंपरेशी अतूट नाते असलेला उत्सव आहे. या सणाचा इतिहास निश्चित प्राचीन आहे. निसर्गावर आधारित
साजरे होणारे सण हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण त्याचे जागतिक अद्वितीय मूल्य अधोरेखित करतात. यामुळे भारतीय सण, परंपरा पर्यायाने भारतीय संस्कृतीचा जगात प्रसार होण्यास हातभार लागणार आहे.
आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेला हा ऐतिहासिक गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री
गजेंद्र सिंह शेखावत जी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले, असे नमूद करीत मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या माध्यामातून पंतप्रधान
नरेंद्र मोदी व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार व्यक्त केले.कधी
प्रश्नोत्तरांनंतर पुन्हा लक्षवेधीचे कामकाज घेण्यात आले त्यात लाडक्या बहिण योजनेच्या अंमलबजावणीवरुन विरोधकानी सभात्याग केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठा घोळ झाला आहे, असा गंभीर आरोप करत महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत,
असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती त टकरे यांनी या योजनेच्या यश स्वी अंमलबजावणी बाबत ग्वाही दिली. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
त्यानंतर विधेयकांचे कामकाज घेण्यात आले त्यात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयक २०२५
महाराष्ट्र जन विश्वास विधेयक २०२५ महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे विधेयके २०२५ यांचा समावेश होता.
त्यानंतर सन २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू करण्यातआली.
त्यात नगर विकास गृहनिर्माण आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागांच्या मागण्यावर चर्चा आणि मतदान घेण्यात आले.
चर्चेला सुरूवात करताना शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी मुंबई महानगर पालिकेच्या दिंडोशी भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तिव्र संताप व्यक्त केला
आणि अधिकारी वातानुकूल दालनात बसून राहतात मात्र जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागते असे ते म्हणाले. अमित देशमुख यांनी देखील यावेळी चर्चेत भाग घेतला.
हे समालोचन लिहून पुर्ण होत असताना सभागृहात पुरवणी मागण्यांवरील चर्चा सुरूच होती.
किशोर आपटे
(लेखक व राजकीय विश्लेषक)

हेही वाचा – Assembly-debate : विधानसभा समालोचन दि.९ डिसें २५