बलाढ्य व पराक्रमी भारतीय नौसेने ला मानाचा मुजरा

Indian -Navy-Day : ईवान च्या वतीने भारतीय नौसेना दिवस उत्साहात साजरा

Indian -Navy-Day : 1971 च्या भारत पाकिस्तान युध्दामध्ये भारतीय नौसेने ने कराची बंदरावर हल्ला करून पाकिस्तान ची कंबर मोडली व विशाखापट्टणम वरचा हल्ला परतवून पुर्व पाकिस्तान च्या नेव्हीचे उच्चाटन करण्यात अभूतपूर्व कामगिरी केली. (Nausena-Diwas)

Nausena-Diwas : ऑपरेशन ट्रायडेंट च्या या पराक्रमाची आठवण करून नौसेनेच्या विरता व साहसाला सलामी देण्याकरीता व युध्दात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या, अमर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता माजी वायूसैनिक कल्याण संघटना, (ईवान), नागपुरच्या वतीने गुरुवार दि. 4 दिसंबर 2025 ला अमर जवान स्मारक, अजनी चौक नागपुर येथे “भारतीय नौसेना दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात मोठ्या संख्येने तिन्ही सेनेचे पुर्व सैनिक, माजी सैनिक परीवार,महीला, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ब्रिगेडियर सुनील गावपांडे (से. नि.) ह्यानी भूषविले. सोबत कमोडोर आनंद अभ्यंकर, (से. नि.), ग्रुप कॅप्टन विजय हरदास (से. नि.), स्काॅ.लीडर के सी दानी (से. नि.) तसेच नौदला चे वरिष्ठ वेटरन मंचावर विराजमान होते. त्यांनी आपल्या भाषणातून भारतीय नौसेने चा पराक्रमी इतिहास सांगत उपस्थित सर्वांनाच नौसेना दिवसाच्या शुभेछा दिल्या.
कार्यक्रमा ची सुरुवात बलिदानी अमर जवानांना मानवंदना देऊन करण्यातआली . कार्यक्रमाला उपस्थित नौसेनेच्या पुर्व सैनिकांनी नेव्हीतील आपले अनुभव कथन केले.

कार्यक्रमाला माजी वायूसैनिक कल्याण संघटनेचे उपाध्यक्ष  मधुकरभांडारकर, सचिव .अजय गाढवे, पदाधिकारी व सदस्यगण व वेटरण संघटनेचे सर्व पदाधिकारी सहपरीवार सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संचालन गुरूदत्त खातखेडे नी केले व नेवी वेटरन अजय खोब्रागडे जी नी आपल्या प्रास्ताविकात नौसेना चा आजवरचा इतिहास सांगितला.
रविकांत नारखेडे नी आभार प्रदर्शन केले.
शेवटी भारत माता की जय च्या उद्घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

हेही वाचा :नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव; बुलढाण्यात सत्ताधारी पक्षाकडून बोगस मतदान, कठोर कारवाई करा

हेही वाचा:नागपूर खंडपीठाचा आदेश अधिकार क्षेत्राबाहेरचा ; निवडणूक प्रक्रियेत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

Social Media