Lemon-tea : दूधयुक्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारकच आहे.…
तसेच हा चहा दिवसभरात दोन कपपेक्षा जास्त पिऊच नये असे तज्ञही सांगतात. परंतु, तुम्हाला लेमन टी पिण्यास काहीच हरकत नाही.
कारण, लेमन टी नियमित प्यायल्याने आरोग्य चांगले राहते. लेमन टी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात….
आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त!!
हल्ली अनेकजण आपल्या आरोग्याबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे व्यायाम आणि आहाराला आरोग्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
चहा म्हणजे भारतीयांचा वीक पॉईंट म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. मात्र मागच्या काही काळापासून चहा आणि कॉफी आरोग्यासाठी चांगली नसते याबाबत बरीच चर्चा झाली. मग अनेकांनी सामान्य चहा घेणे बंद केले.
मात्र त्यामुळे ब्लॅक टी, लेमन टी/लिंबू चहा यांसारख्या गोष्टींची मागणी वाढली. लेमन टी बनवणे सोपे असून तो शरीराचा क्लिंझर म्हणून उपयुक्त ठरतो. आता यामध्ये असे कोणते घटक असतात ज्याचे आरोग्याला फायदे होतात. याबाबत फारच कमी जणांना माहिती असते.
लेमन टी म्हणजे नेमके काय?(Lemon-tea)….
लेमन टी म्हणजे कोरा चहा ज्यामध्ये लिंबू पिळलेले असते. लिंबामुळे या चहाला वेगळी चव येते. यामध्ये पाणी, चहा, खडीसाखर किंवा मध आणि लिंबू इतकेच असते. चहात लिंबू पिळल्याने त्याची केवळ चवच नाही तर रंगही बदलतो. कोरा चहा कोमट झाल्यावरच त्यात लिंबू पिळावा आणि मध टाकावा, गरम असताना या दोन गोष्टी टाकू नये याची विशेष काळजी घ्यावी.
क्लिंझर आणि डिटॉक्सिफायर(Cleanser and Detoxifier)
शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी लेमन टीचा उपयोग होतो.
याबरोबरच शरीरात असणारे विविध संसर्ग आणि आजार दूर होण्यासही लेमन टी उपयुक्त ठरतो.
सर्दी आणि तापावरील उपचार(Lemon-tea)
लेमन टीमुळे सर्दी आणि ताप कमी होण्यास मदत होते. या चहाचा जास्त उपयोग व्हावा यासाठी यामध्ये थोडे आले टाकल्यास फायदा होतो. असा आले घातलेला चहा घेतल्यास घसेदुखीवरही आराम मिळतो. तसेच यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पावसाळी वातावरणात वाजणारी थंडी यामुळे कमी होण्यास मदत होते.
नैसर्गिक अँटीसेप्टीक(Natural antiseptic)
लिंबामध्ये निसर्गत: अँटीसेप्टीक गुण असतो. लेमन टीमध्ये अँटी बॅक्टेरीयल आणि अँटी व्हायरल घटक असतात. त्यामुळे एखाद्याला आधीपासून काही इन्फेक्शन किंवा आजार असतील तर ते बरे होण्यास मदत होते.
त्वचेसाठी उपयुक्त
आपली त्वचा छान नितळ असावी असे आपल्यातील बहुतांश जणांना वाटते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. तसेच लिंबामध्ये ऍस्ट्रींजंटचे घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होण्यास तसेच त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते…
अधिकचे फायदे….
१. लेमन टी मुळे पचनसंस्था निरोगी राहते. शरीरात उर्जा निर्माण होते. दिवसभर तजेलदार दिसू शकता.
२. दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. कोलेस्टरॉल कमी होते.
३. यातील व्हिटॅमिन-सीमुळे मुरूमे आणि काळे डाग कमी होतात. यात मध आणि खडीसाखर टाकून घेतल्यास चेहरा तजेलदार दिसतो.
४. सकाळी उठल्यावर योग, सूर्यनमस्कार, व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होते. भुक ही नियंत्रित राहते.
५. पचनसंस्थेचे शुद्धीकरण होते. टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात. पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत.
६. तसेंचं यात आले टाकून दिवसातून ३-४ वेळा घेतल्यास सर्दी बरी होते.
७. घशाची खवखव, खोकला बरा होतो.
८. सोबतच मध टाकून घेतल्यास श्वसनाचे आजार होत नाहीत.
९. कायम पोट साफ राहते.
१०. ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.