विधिमंडळाच्या प्रवेशिकेवरून राजमुद्रा गायब- विरोधकांना मिळणार आयती संधी

मुंबई : Rajmudra : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन(Monsoon session) सोमवारपासून मुंबईत सुरु झाले आहे या अधिवेशनात महाविकास आघाडी महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असतानाच आता विधिमंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रवेशिकेवरून राजमुद्रा गायब झाल्याने विरोधकांना हा आयात मुद्दा हाती लागला आहे या विषयावरून ते महायुती सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे .

विधिमंडळाचे पावसाळी, अर्थसंकल्पीय व हिवाळी अधिवेशने होतात या अधिवेशनात राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर विरोधक सरकारचे लक्ष्य वेधतात तसेच राज्याची ध्येय धोरणे या अधिवेशनांमध्ये मांडली जातात, राज्यातील जनतेने या अधिवेशनाकडे बारकाईने लक्ष असते यावेळी सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु झाले आहे या अधिवेशनासाठी पत्रकार, माजी आमदार, खासदार तसेचअभ्यागत ,विद्यार्थी याना प्रवेशिका देण्यात येतात. तर पत्रकारांना प्रवेशिका तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गॅलरी प्रवेशिका देण्यात येतात . या अधिवेशनात देण्यात आलेल्या विधानभवन प्रवेशिका तसेच गॅलरी प्रवेशिकेवरील अशोक स्तंभाची राजमुद्रा (Rajmudra)तसेच ‘सत्यमेव जयते’ ही अक्षरेच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .

भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला यंदा ७५ वर्षे पूर्णझाली . या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधानभवनात एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद२३ व २४ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली होती ,या कार्यक्रमातून देखील राजमुद्रा गायब झाली होती त्याऐवजी सेंगोलचे चिन्ह वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.आता राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी दिल्या जाणाऱ्या अधिकृत ओळखपत्रावरील राजमुद्रा यावर्षी गायब झाल्यामुळे मुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आतापर्यंतच्या प्रत्येक अधिवेशनाच्या ओळखपत्राच्या मध्यभागी राजमुद्रा(Rajmudra) विराजमान झालेला होती. पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच राजमुद्रा गायब झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. आता कामकाजाच्या पुढील काही दिवसात प्रवेशिका ओळखपत्रावरील राजमुद्रेचा मुद्दा सभागृहात उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Social Media