84-percent-schools-Marathi : महाराष्ट्रात ८४ टक्के शाळा मराठी हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भातील अहवालासंदर्भात दिली माहिती
महाराष्ट्रात मराठीच अनिवार्य आहे. मराठी शाळा बंद पडल्या नाहीत, 84 टक्के शाळा मराठी माध्यमांच्या आहेत, 69 टक्के विद्यार्थी मराठी शिकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्याची माहिती कपोलकल्पित आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
कुंभमेळ्यामुळे यूपीचे ब्रँडिंग हे जगात झाले, आपल्याला ही कुंभमेळ्यातून जगात महाराष्ट्राचे ब्रँडिंग करायचे आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ती जोपासायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भातील अहवालासंदर्भात दिली माहिती (84 percent schools Marathi)
नवीन शैक्षणिक धोरणासाठी 21 सप्टेंबर 2020 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती नेमली, त्यात वेगवेगळे कुलगुरू होते, शिक्षणतज्ज्ञ होते. विजय कदम हे महत्वाचे नाव आहे, ते ठाकरे सेनेचे नेते पण आहेत. या कमिटीत 16 लोक मराठी होते. या समितीने उद्धव साहेबांकडे अहवाल दिला.
त्यावर उद्धवजींनी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. 15 सप्टेंबर 2021 रोजी यावर बातम्या झाल्या. बदलत्या काळात या शिफारसीनुसार, महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी या शिफारसी गरजेच्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या शिफारसमध्ये इंग्रजी व हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्षापासून लागू करावी असे म्हटलंय.
पहिली ते बारावी इंग्रजी शिकतील, उच्च शिक्षण संस्थांमध्ये मराठीला प्राधान्य द्यावेच लागेल. पण इंग्रजी व हिंदी पहिली ते बारावीपर्यंत सक्तीची करावी, अशी माहितीही फडणवीसांनी दिली. मी जयंत पाटील यांना विचारतो, अहवाल मंत्रिमंडळ स्विकारतो ना? 14 सप्टेंबर 2021 रोजी अहवाल सादर झाला.
20 सप्टेंबर रोजी तो मंत्रिमंडळात ठेवला. मी त्याचे इतिवृत्त घेऊन आलो आहे. डॉ. माशेलकर समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तसेच, यावर सही कुणाची? आदित्य जी सांगतील ना? मंत्री कोणीही असू द्या असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. तसेच, मुख्यमंत्री असताना मंत्र्यांचे काहीही अस्तित्व नसते, असेही त्यांनी म्हटले.
देशाचे स्टार्टअप हब महाराष्ट्र
देशाचे स्टार्टअप हब हे आता बंगलोर नाही तर महाराष्ट्र आहे, देशातील 20 टक्के स्टार्टअप एकट्या महाराष्ट्रात आहे. युनिकॉर्न म्हणजे मोठे स्टार्ट अप हे देशातील 129 पैकी 28 हे महाराष्ट्रात आहेत. स्टार्टअप कॅपिटल म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो. जयंतराव तुम्ही थ्री इडियट्समधील एक डायलॉग ऐकवला, दुसरा डायलॉग मी ऐकवतो, “काळजी करू नका, ऑल इज वेल..” असे म्हणत देशातील उद्योग व्यवसायासंदर्भाने मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राचं ब्रँडिंग
जयंतराव आणि वडेट्टीवार, कुंभमेळ्यावर तुम्हाला एवढा राग का? कुंभमेळा हा दर साडेबारा वर्षांनी येणारा आहे. जगात इतक्या मोठ्या प्रमाणात मेळावा होत नाही, ही आपली आस्था आहे. तिथे कुणी कुणाला जात विचारत नाही, सर्व जातीचे व पंथाचे लोक एकत्र येतात. वेगवेगळ्या धर्माचे लोक देखील एकत्र येतात. प्रयागराजला गुंतवणूक केली त्याहून अधिक परतावा त्यांना मिळाला, ज्या व्यवस्था आपण करतोय, त्या कुंभ मेळ्यापुरत्या मर्यादित नाहीत. पर्यावरणसाठी उपाययोजना करतोय. रस्ते रुंदीकरण, एअरपोर्ट, रिंग रोड करतोय. त्यामुळे धार्मिक व इतर पर्यटन वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसचे, 2025 साली बेरोजगारीचा दर 3.1 टक्के आहे, मागील वर्षांच्या तुलनेत बराच कमी आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.