2Govindas-died-in-DahiHandi
मुंबई : राज्यभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळालाय. परंतु राज्यातील काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल आहे. दहीहंडीच्या उत्सवात गोविदांची सुरक्षा वा-यावर असल्याची पाहायला मिळाली.
कारण शनिवारी मानखूर्दमध्ये 32 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. तर 100 हून अधिक गोविंदा हे गंभीर जखमी झाले आहेत.2Govindas-died-in-DahiHandi
मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीची दोरी बांधताना पथकातील एक सदस्य खाली पडला. जखमीला ताबडतोब गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की त्या तरुणाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आले.
दरम्यान, दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला. दरवर्षी सुरक्षा कवच म्हणून गोविंदांचा विमा ही काढण्यात येतो . यावर्षी तर तब्बल दीड लाख गोविंदाचे विमा उतरवण्यात आलेत. मात्र त्याच्या सुरक्षेसाठी ठोस अशी पावलं का उचलली जात नाही? असा सवाल दहीहंडी उत्सवात झालेल्या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.2Govindas-died-in-DahiHandi :
.