“मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटायला हवी!” – गोविंदा आणि अभिनेत्रीला पाहून सुनीता आहुजा भडकल्या; ‘शुगर डॅडी’वरून लगावला टोला!

गोविंदा-घडामोडी-बातम्या-मराठी : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा(Govinda) पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा(Govinda)आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील दुराव्याच्या चर्चा रंगत असतानाच, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नुकताच गोविंदा मुंबई विमानतळावर (Mumbai-Airport) आगामी ‘रूपा’ चित्रपटातील नवी अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर (Komal-Rani-Swarnakar)हिच्यासोबत एकत्र स्पॉट झाला. या घटनेनंतर सुनीता आहुजा यांनी दिलेली रोखठोक आणि आक्रमक प्रतिक्रिया सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

विमानतळावरील ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण (गोविंदा-घडामोडी-बातम्या-मराठी)

विमानतळावर पापाराझींनी गोविंदा आणि राणी स्वर्णकर यांना एकत्र कॅमेऱ्यात कैद केले. या वेळी दोघांनीही हसतमुखाने पोझ दिल्या. एवढेच नव्हे तर गोविंदाने राणीला कॅमेऱ्यासमोर एकटीने पोझ देण्यासाठी प्रोत्साहनही दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच गोविंदाच्या कथित अफेअरच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला.

सुनीता आहुजांचा जोरदार हल्लाबोल: “विनाश हा बुद्धिमत्तेच्या विरुद्ध…”

या संपूर्ण प्रकारावर जेव्हा पापाराझींनी सुनीता आहुजा यांना ‘रूपा’ चित्रपटाच्या प्रमोशनबाबत विचारले, तेव्हा त्यांनी अजिबात संकोच न बाळगता थेट शब्दांत ताशेरे ओढले:

“चित्रपट आधी बनायला तर हवा, त्यानंतरच प्रमोशन होणार ना? तो (गोविंदा) आपल्या स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे, त्याला लाज वाटली पाहिजे!”

— सुनीता आहुजा

सुनीता इथेच थांबल्या नाहीत, तर त्यांनी अभिनेत्रीच्या कपड्यांवर आणि स्टाईलवरही टीका केली. “जर तिचा ‘शुगर डॅडी’ (sugar- daddy)एवढा श्रीमंत असेल, तर तिने किमान सभ्य कपडे तरी घालावेत,” असा बोचरा टोला त्यांनी लगावला. शेवटी गोविंदाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, “तो आता पूर्णपणे वेडा झाला आहे.” Sunita Ahuja calls Govinda sugar daddy

गोविंदाने मांडली स्वतःची बाजू

सुनीता यांच्या या तीव्र आरोपांवर गोविंदाने यापूर्वीच अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली होती. गोविंदाच्या मते, त्याची पत्नी प्रेमाने त्याला हिणवत असते आणि तोही तिच्या सर्व गोष्टी प्रेमानेच स्वीकारतो. सुनीताच्या या वक्तव्यांकडे तो एका विनोदाच्या किंवा कौटुंबिक संवादाच्या दृष्टीनेच पाहतो, असे त्याच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

नात्यातील दुरावा आणि रंगणाऱ्या चर्चा

गोविंदा आणि सुनीता आहुजा (Sunita-Ahuja) यांचे लग्न मार्च १९८७ मध्ये झाले असून त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभक्त होण्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवा सतत समोर येत आहेत. त्यातच आता राणी स्वर्णकर हिच्यासोबत गोविंदाचे विमानतळावर दिसणे आणि त्यावर सुनीता यांनी दिलेली खरपूस प्रतिक्रिया यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. Govinda caught with Komal Rani Swarnkar

सध्या या विषयावर सोशल मीडियावर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, गोविंदा किंवा अभिनेत्री राणी स्वर्णकर यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.

Social Media